बातम्या
ग्रेटर फरीदाबादमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघेजण ताब्यात
By nisha patil - 2/10/2026 3:59:59 PM
Share This News:
ग्रेटर फरीदाबादमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघेजण ताब्यात
हरियाणातील ग्रेटर फरीदाबाद परिसरात १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार आणि तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली असून, अन्य तिघेजण फरार आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी क्लासमधून घरी जात असताना तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. दोघी एकत्र असताना सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना एका पडक्या इमारतीत नेले. तेथे जिवे मारण्याची धमकी देत संशयितांनी १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तिच्या मैत्रिणीचा विनयभंग करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर भीतीपोटी दोन्ही मुलींनी सुरुवातीला कुटुंबीयांना काही सांगितले नाही. मात्र, पीडित मुलीच्या वर्तनात बदल जाणवल्यानंतर तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलीने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी २९ सप्टेंबर रोजी बीपीटीपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार आणि वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. कुणाल, दीपक आणि यश या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील फरार असलेल्या उर्वरित तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ग्रेटर फरीदाबादमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघेजण ताब्यात
|