बातम्या
कुंभी धरणातून 1300 क्युसेक पाणी विसर्ग
By nisha patil - 8/18/2025 11:55:31 AM
Share This News:
कुंभी धरणातून 1300 क्युसेक पाणी विसर्ग..
कुंभी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
कोल्हापूर -: कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर वक्र द्वाराद्वारे 1000 क्युसेक व विद्युतगृहातून 300 क्युसेक असा एकूण 1300 क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्यास अथवा येवा वाढल्यास विसर्गात बदल (कमी-जास्त) करण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले. या विसर्गामुळे कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कुंभी धरणातून 1300 क्युसेक पाणी विसर्ग
|