शैक्षणिक
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’मध्ये
By nisha patil - 8/19/2025 6:18:36 PM
Share This News:
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’मध्ये
शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्तायादी जाहीर झाली असून डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंगमधील तब्बल १४ विद्यार्थी ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत.
कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये सिद्धीका कृष्णात पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विभागाच्या सात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले असून साक्षी जाधव (द्वितीय), आदिती पाटील (तृतीय), अर्चिता गोपलानी (चौथा), निहालअहमद शेख (पाचवा), मानसी सूर्यवंशी (सातवा) व साक्षी मेंकर (आठवा) यांचा समावेश आहे.
सिव्हीलमध्ये सानिका मोहिते हिने द्वितीय क्रमांक, मॅकेनिकलमध्ये दस्तगीर जमादार (द्वितीय) आणि वैष्णवी वरपे (तृतीय) तर इलेक्ट्रिकल विभागात सानिका लांबे (पाचवा), अनिकेत चव्हाण (सहावा), राजवर्धन चौगुले व रसिका कातवारे (संयुक्त नववा) क्रमांकावर चमकले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’मध्ये
|