खेळ
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आयपीएलमध्ये धडाकेबाज शतक
By nisha patil - 4/29/2025 5:22:10 PM
Share This News:
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आयपीएलमध्ये धडाकेबाज शतक
आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीर ठरला वैभव सूर्यवंशी
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने केवळ ३५ चेंडूंमध्ये धडाकेबाज शतक झळकावून इतिहास रचला. गुजरात टायटन्सविरुद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने अनुभवी गोलंदाजांविरोधात तडाखेबंद फलंदाजी केली.
हे शतक आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक ठरले असून, वैभव युसुफ पठाणलाही मागे टाकत सर्वात जलद शतक करणारा भारतीय ठरलाय. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण आणि वरिष्ठ टी-२० क्रिकेटमधील कमी वयातील शतकवीर ठरला आहे.
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आयपीएलमध्ये धडाकेबाज शतक
|