विशेष बातम्या

“गळी माळ डोंगरावर १५ गवे! ग्रामस्थांची दिवसभर धावपळ, वनविभाग बेपत्ता”

15 cows on Gali Mal mountain! Villagers


By nisha patil - 6/12/2025 6:00:30 PM
Share This News:



“गळी माळ डोंगरावर १५ गवे! ग्रामस्थांची दिवसभर धावपळ, वनविभाग बेपत्ता”

शिरोली दुमाला ते नरगेवाडी मार्गावरील गळी माळ डोंगर परिसरात तब्बल १५ गव्यांचा कळप दिसल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजता विशाल पाटील गोठ्याकडे जात असताना हा मोठा कळप त्यांच्या नजरेस पडला.

त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत व नागरिकांना कळविल्यानंतर सरपंच सचिन पाटील, सदस्य अरुण पाटील, सागर घोटणे आणि लिपीक शिवकुमार पाटील घटनास्थळी दाखल झाले. दिवसाभर गावकऱ्यांनी गव्यांना सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गवे वारंवार परत त्या परिसरातच घुटमळताना दिसत होते.

दरम्यान, सरपंच सचिन पाटील यांनी वनविभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनीही पुनःपुन्हा फोन करून कळविले. तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंतही वनविभागाचा पत्ता लागला नाही, यामुळे वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.


“गळी माळ डोंगरावर १५ गवे! ग्रामस्थांची दिवसभर धावपळ, वनविभाग बेपत्ता”
Total Views: 8