बातम्या

उसाच्या शेतातील 15 किलो गांजा जप्त .

15 kg of marijuana seized from sugarcane field


By nisha patil - 4/18/2025 4:32:51 PM
Share This News:



उसाच्या शेतातील 15 किलो गांजा जप्त .

•करवीर तालुक्यातील शेळेवाडी येथे कारवाई 

करवीर तालुक्यातील शेळकेवाडी इथं गांजा उसाचा शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. जयदीप अशोक शेळके असं आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या शेतातून १ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा 15 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या संदर्भात साठा, विक्री,व शेती करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शोध घेत होते. यादरम्यान करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी रोडवरील विठ्ठलाई परिसरातील उसाच्या शेतामध्ये संशयित आरोपी जयदीप शेळके यांनी गांजाच्या रोपट्यांची लागवड केल्याचे समजलं. त्यानुसार छापा टाकून ती कारवाई करण्यात आलीय.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदारा वैभव पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव ,अशोक पवार,राजू येडगे यांच्यासह पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.


उसाच्या शेतातील 15 किलो गांजा जप्त .
Total Views: 115