बातम्या
१५ वर्षांचा ठप्प विकास, काँग्रेस अपयशी – खासदार धनंजय महाडिक"
By nisha patil - 9/22/2025 2:52:42 PM
Share This News:
१५ वर्षांचा ठप्प विकास, काँग्रेस अपयशी – खासदार धनंजय महाडिक"
"महापालिकेत सत्ता द्या, शहराचा होईल गतीमान विकास – महाडिक"
कोल्हापूर महापालिकेवर १५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसचा ताबा असूनही शहराच्या विकासासाठी एकही ठोस प्रकल्प राबवला गेला नाही. अपूर्ण पाणीपुरवठा प्रकल्पामुळे आजही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे शहराचा विकास व्हायचा असेल तर महापालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
राजेंद्रनगर परिसरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी खासदार महाडिक बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्षा रुपाराणी निकम, संग्राम निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
१५ वर्षांचा ठप्प विकास, काँग्रेस अपयशी – खासदार धनंजय महाडिक"
|