बातम्या
कोल्हापुरात गर्दीतून दीडशे मोबाइल, १५ तोळे दागिने आणि सात दुचाकी लंपास
By nisha patil - 8/9/2025 3:01:50 PM
Share This News:
कोल्हापुरात गर्दीतून दीडशे मोबाइल, १५ तोळे दागिने आणि सात दुचाकी लंपास
विसर्जन मिरवणुकीत हातसफाईचा खेळ, पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस
गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत मोठा डल्ला मारला. दीडशेहून अधिक मोबाइल, तब्बल १५ तोळ्यांचे दागिने आणि सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घडलेल्या या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून रविवारी दिवसभर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
मोबाइल चोरीच्या १०६ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून दागिने आणि पर्स लंपास झाल्याच्या २० ते २५ तक्रारीही पोलिसांकडे दाखल आहेत. दुचाकी चोरीच्याही सात घटना घडल्या असून चोरीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांच्या या उच्छादानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
कोल्हापुरात गर्दीतून दीडशे मोबाइल, १५ तोळे दागिने आणि सात दुचाकी लंपास
|