बातम्या
वंदे मातरम्”ला १५० वर्षे पूर्ण — देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमला कोल्हापूर जिल्हा!
By nisha patil - 7/11/2025 5:40:04 PM
Share This News:
वंदे मातरम्”ला १५० वर्षे पूर्ण — देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमला कोल्हापूर जिल्हा!
रताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणेचा दीप पेटवणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान म्हणून राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच सर्व तालुक्यांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
देशाला दिशा देणारे आणि सर्वधर्मसमभावाची भावना रुजवणारे ‘वंदे मातरम्’ हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाचा नवा संचार करते — आणि त्याच्या १५० व्या वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमला.
वंदे मातरम्”ला १५० वर्षे पूर्ण — देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमला कोल्हापूर जिल्हा!
|