बातम्या

लोकशाही दिनात 153 अर्ज दाखल

153 applications filed on Lokshahi Din


By nisha patil - 6/10/2025 5:37:40 PM
Share This News:



लोकशाही दिनात 153 अर्ज दाखल

कोल्हापूर, दि. 6 महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या लोकशाही दिनात एकूण 153 अर्ज दाखल झाले, यापैकी महसूल विभाग - 46, कोल्हापूर महानगरपालिका- 17, जिल्हा परिषद - 32, सहकार विभाग- 10, पोलीस विभाग- 10, भूमी अभिलेख- 13 तर इतर विभागांचे 25 अर्ज होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकशाही दिनात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख शिवाजीराव भोसले, तहसिलदार करमणूक तेजस्विनी पाटील, नितीन धापसे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकशाही दिनात 153 अर्ज दाखल
Total Views: 59