बातम्या
कोल्हापुरातील १६ कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश!
By nisha patil - 7/15/2025 8:59:51 PM
Share This News:
कोल्हापुरातील १६ कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश!
कोल्हापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी भाजपमध्ये
"आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इनकमिंगला वेग आला आहे.
आज मुंबईतील भाजप मुख्यालयात कोल्हापुरातील १६ कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि इतर नेते उपस्थित होते.
कोल्हापुरातील १६ कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश!
|