बातम्या
सहविचार सभेत मुख्याध्यापकांचे मंथन ; उपशिक्षणअधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चा*
By nisha patil - 3/7/2026 3:57:53 PM
Share This News:
*सहविचार सभेत मुख्याध्यापकांचे मंथन ; उपशिक्षणअधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चा*
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक संघ, विद्याभवन शिवाजी पार्क येथे आज माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेत करवीर, कोल्हापूर शहर आणि गगनबावडा तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते .
सहविचार सभेत मुख्याध्यापकांचे उपशिक्षण अधिकाऱ्यांनी विविध १७ विषयांवर शैक्षणिक मंथन केले . प्रारंभी मुख्याध्यापक संघाचे सचिव आर .वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . प्रारंभी महापालिकेच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांनी अतिरिक्त पुस्तकांच्या समायोजनाबाबत माहिती दिली तसेच समाज माध्यमांच्या गैरवापराबाबत कार्यशाळा, पूरपरिस्थिती सजगता, विद्यार्थी सुरक्षा विषयक नियमावली आणि नशामुक्ती उपक्रम याबाबत माहिती दिली . उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी व्ही.एस . के. पोर्टलवरील विद्यार्थी हजेरी नोंद, विविध समित्यांचे गठण, विद्यार्थी प्रमोशन, आधार व्हॅलिड विद्यार्थी, जात, जन्म आणि नावातील बदलांबाबतच्या प्रस्तावाबाबत मुख्याध्यापकांना सजग केले . पर्यावरण मोहिमेबाबत शाळांनी शाळेत इकोक्लब स्थापन करून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याविषयी आवाहन केले . दोन महिन्यात शाळांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक मिळतील असा आशावादही व्यक्त केला . उपशिक्षणाधिकारी आर . जी . चौगुले यांनी पटसंख्या टिकवणे शाळांसमोर आव्हान असून मुख्याध्यापकांनी शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करणेविषयी आवाहन केले . वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा असली पाहिजे हे सांगतानाच प्रशासनात भावनेला फार महत्व देवू नये असेही सांगितले . नशामुक्ती अभियान, चिराग ॲप, विद्यार्थी सुरक्षा, तक्रारपेटी, सीसीटीव्ही, सखी सावित्री याबाबतच्या कार्यवाहीचे विवेचन केले . उपशिक्षणअधिकारी धनाजी पाटील यांनी एच. पी.व्ही. लसीकरण, पालकसभा, अकरावी प्रवेश, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार याबाबतचे विवेचन केले . मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संचालक बी. बी. पाटील, संजय पाटील, दत्ता पाटील, युवराज पाटील, सुरेश संकपाळ, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुधीर सातवेकर, अश्विनी पाटील, वृषाली कुलकर्णी, विजय भोगम आदी मान्यवर उपस्थित होते .
सहविचार सभेत मुख्याध्यापकांचे मंथन ; उपशिक्षणअधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चा*
|