ताज्या बातम्या
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन
By nisha patil - 12/4/2026 1:17:02 PM
Share This News:
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन
मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे अखेरचा श्वास
भारतातील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं रविवारी (12 एप्रिल) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअर) त्यांचं निधन झालं. याआधी त्यांना छातीचा संसर्ग आणि तीव्र थकवा जाणवत होता.
सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी 11 ते 2 दरम्यान लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन
|