ताज्या बातम्या
सलगरे ते पाचवा मैल मार्गावरील अर्जुनवाड येथील अपूर्ण कामास सुरुवात
By nisha patil - 4/5/2026 3:23:32 PM
Share This News:
सलगरे ते पाचवा मैल मार्गावरील अर्जुनवाड येथील अपूर्ण कामास सुरुवात
आंदोलन अंकुश संघटना, प्रसारमाध्यमानी केलेल्या पाठपुराव्यास यश. सलगरे ते पाचवा मैल हा राज्यमार्ग शिरोळ तालुक्यातून जातो .सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या देखरेखीखाली राजपथ कंस्ट्रक्शन कंपनीकडून गेली तीन वर्षापासून सुरू आहे. या मार्गावर शिरोळ, कुरुंदवाड, अर्जुनवाड या ठिकाणी रस्त्याची भरपूर कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामधील अर्जुनवाड गावालगत पश्चिम बाजूचा सुमारे पाचशे मीटर रस्ता अपूर्ण होता.
एका बाजूला नवीन रस्ता दुसऱ्या बाजूला दीड फुट खाली असलेला जुना रस्ता यामुळे या ठिकाणी वाहनधारकाला अंदाज येत नसल्यामुळे वारंवार अपघात होत होते . त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार लक्षात घेऊन आंदोलन अंकुश संघटने कडून गेली दोन महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. वेळोवेळी निवेदन दिली, बैठका झाल्या, रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला.
तसेच तालुक्यातील पत्रकारांनी सुद्धा हा प्रश्न अगदी जोरदारपणे प्रसार माध्यमातून मांडला .त्यामुळे आज या सर्वांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या रस्त्यावर अजूनही भरपूर काम अपूर्ण आहेत ती सर्व पूर्ण झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
यावेळी आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चूडमुंगे,जिल्हाध्यक्ष दिपक पाटील ,राकेश जगदाळे, उद्धव मगदूम , जितेंद्र चौगुले,यशवंत कदम, मोहन खोत ,अमोल चौगुले, संजय चौगुले, पी आर खोत ,राहुल गायकवाड, गजानन करे, राजपथ कन्स्ट्रक्शन चे अधिकारी बाहुबली गाढवे, सुपरवायझर जावेद इनामदार इत्यादी उपस्थित होते.
सलगरे ते पाचवा मैल मार्गावरील अर्जुनवाड येथील अपूर्ण कामास सुरुवात
|