महाविद्यालयात एक दिवशी राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न 

1Agreement for the Kikvi project site in Pune is transparent


By nisha patil - 3/10/2026 7:10:33 PM
Share This News:



महाविद्यालयात एक दिवशी राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न 

डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनरमांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे 

इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान वर शहाजी

कोल्हापूर: ज्येष्ठ इतिहास संशोधक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील माजी इतिहास विभाग प्रमुख,इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी  विविध ऐतिहासिक पुराव्यांसहित इतिहासाची  पुनरमांडणी केली, पुनर्लेखन केले.  राजर्षी शाहू महाराजांच्या वरती बृहत ग्रंथ लिहून त्यांचे विचार जगभर पोचवणारे आणि मराठ्यांचा इतिहासाची व्याप्ती वाढवणारे ते संशोधक होते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी केले. 
   

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. 
यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या यांच्यावरील  शहाजी वार्ता च्या तिसाव्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.  
     

प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे म्हणाले ,श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली 28 वर्षे त्यांनी इतिहास लेखनाचे काम केले. शहाजी महाविद्यालयात त्यावेळी नामांकित प्राध्यापकांची ,संशोधकांची,  लेखकांची  फळी होती. त्यांनी महाविद्यालयाचा लौकिक महाराष्ट्रभर वाढवला. जयसिंगराव पवार त्यात अग्रस्थानी होते.
     यावेळी श्रीमती वसुधा जयसिंगराव पवार नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे प्राचार्य टी एल पाटील प्रा. अरुण भोसले, डॉ. अरुंधती पवार,मंजुश्री पवार,डॉ रघुनाथ डमकले ,श्री शिपुरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  उद्घाटन सत्राचे स्वागत डॉ. आर.डी.मांडणीकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर.के .शानेदिवाणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पि.के.पाटील यांनी केले. आभार डॉ. शिवाजी रायजादे यांनी     मांनले.  

 

 परिसंवादातील पहिल्या सत्रात डॉ. अवनीश पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखनातील डॉ. जयसिंगराव पवार यांचे योगदान या विषयावर सविस्तर विवेचन केले.  शाहू महाराजांना सामाजिक क्रांतीचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवले .महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील ते सेतू झाले हे पवार सरांनी साऱ्या जगाला दाखवून दिले .पवार सरांची भाषा, लेखनशैली साधी सोपी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, सर्वांना समजणारी अशी होती. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी पंचगंगेच्या तीरावरून या जयसिंगराव पवार यांच्या आत्मचरित्राबद्दल सविस्तर विवेचन केले. या आत्मचरित्रात सरांची केवळ जडणघडण नसून संपूर्ण काळाचे ते आत्मवृत्त आहे. सरांची नम्रता, कृतज्ञता, शाहू महाराजांच्या विषयी असणारा आदर, श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या विषयी असणारा आदर त्यांच्या आत्मचरित्रातून दिसतो. या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ.भरत भूषण माळी यांनी भूषवले. 
   

परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात डॉ.सुरेश शिखरे यांनी जयसिंगराव पवार यांची इतिहास लेखन पद्धती : विषेश संदर्भ सेनापती संताजी घोरपडे यांचे चरित्र या विषयावर सविस्तर माहिती दिली. इतिहास डॉ. मंजुश्री पवार यांनी इतिहास संशोधक माझे बाबा यावर आपले मनोगत व विचार व्यक्त केले. डॉ. अरुंधती जयसिंगराव पवार यांनी या राष्ट्रीय परिसंवादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महाविद्यालयाला धन्यवाद दिले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास संशोधक, लेखक प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण होते.
समारोप सत्र प्राचार्य डॉ. जे.के.पवार यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 
   

डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावरील ग्रंथसंपदेचे ग्रंथ प्रदर्शन, त्यांच्या ग्रंथावरील भिंती पत्रकाचे प्रदर्शन व त्यांना मिळालेल्या मान सन्मान पत्राचे व पुरस्कारांचे प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयातील पोर्च समोर संपन्न झाले.  प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिखरे डॉ.आर.डी .मांडणीकर ,डॉ.के.एम.देसाई, डॉ.पूनम भुयेकर,प्रा.अशिस ,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यांनी संयोजन केले .इतिहास विषयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा परिसंवाद संपन्न झाला.


महाविद्यालयात एक दिवशी राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न 
Total Views: 9