बातम्या
कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीसाठी 2.5 हेक्टर जमीन मंजूर...
By nisha patil - 8/21/2025 3:07:26 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीसाठी 2.5 हेक्टर जमीन मंजूर...
आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक वसाहतीसाठी जागा मंजूर
हॉकी स्टेडियम रस्त्यावरील 'विश्वपंढरी'समोरील तब्बल सव्वा सहा एकर जागा आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेसाठी याआधी अनेक संस्थांनी मागणी केली होती. मात्र, महिला उद्योजक घडवण्याच्या उद्देशाने ही जागा महिला सहकारी औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. शासकीय जमीन जाहीर लिलावाशिवाय, रेडी रेकनरनुसार ठरलेली रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून संस्थेला देण्यात येणार आहे.
संस्थेचे नियोजन भूखंड पाडून महिला उद्योजकांना जागा उपलब्ध करून देण्याचे असून, ठरवलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूरमध्ये महिला उद्योगविश्वाला नवी दिशा मिळणार आहे.
कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीसाठी 2.5 हेक्टर जमीन मंजूर...
|