बातम्या

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात २०,००० भाविकांची उपस्थिती!

20 000 devotees attend


By nisha patil - 5/19/2025 3:41:34 PM
Share This News:



‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात २०,००० भाविकांची उपस्थिती!

गोवा फोंडा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. १७ ते १९ मे दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात भारतासह विदेशातून आलेल्या संत, साधू, आणि हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधींची उपस्थिती आहे.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी "हा शंखनाद म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदी आहे" असे प्रतिपादन केले. महोत्सवात अफझलखानवधाचा फलक व प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
🌐 अधिक माहितीसाठी : SanatanRashtraShankhnad.in


‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात २०,००० भाविकांची उपस्थिती!
Total Views: 72