बातम्या

पन्हाळ्यात वनमजूरावर २० जणांचा हल्ला... गुन्हा दाखल

20 people attack forest laborer in Panhala


By nisha patil - 6/17/2025 11:54:53 AM
Share This News:



पन्हाळ्यात वनमजूरावर २० जणांचा हल्ला... गुन्हा दाखल

म्हाळुगे (ता. पन्हाळा) येथील वनविभाग चेकपोस्टजवळ प्रवेश शुल्क मागितल्याच्या कारणावरून वनमजुर अक्षय महाडिक याच्यावर २० जणांच्या टोळक्याने लाठ्या व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. फिर्यादीच्या खांद्याला दुखापत झाली असून, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

या प्रकरणी अमोल नवला केरु, वैभव चपरे, अनिकेत अवघडे आदी २० जणांविरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 115(2), 118(1), 191(1)(2), 190, 189(2), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पन्हाळा पोलीस स्टेशनचे पो.स.ई. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.”

तारा न्यूज प्रतिनिधी, पन्हाळा : शहाबाज मुजावर


पन्हाळ्यात वनमजूरावर २० जणांचा हल्ला... गुन्हा दाखल
Total Views: 434