बातम्या
२१ लिंबू–काळी बाहुलीचा खेळ फसला; सांगरुळात अंधश्रद्धेचा भंडाफोड
By nisha patil - 12/24/2025 4:51:09 PM
Share This News:
२१ लिंबू–काळी बाहुलीचा खेळ फसला; सांगरुळात अंधश्रद्धेचा भंडाफोड
विज्ञानयुगातही अंधश्रद्धेची भीती पसरवण्याचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात समोर येत आहेत. करवीर तालुक्यातील सांगरुळ गावात एका शेताच्या बांधावर भानामती केल्याचा प्रकार निदर्शनास आला. भाताची दुरडी, २१ लिंबू, २१ टाचण्या खोचलेली काळी बाहुली ठेवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र निसर्गप्रेमी दिनकर चौगुले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या भानामतीचा निषेधात्मक आणि वैज्ञानिक पद्धतीने भंडाफोड केला. नारळ फोडून खाणे, लिंबूंचे सरबत करणे आणि उर्वरित साहित्य जाळून त्यांनी अंधश्रद्धेला आव्हान दिले. समाजाने अशा प्रकारांना घाबरून न जाता विवेकाने सामोरे जावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
२१ लिंबू–काळी बाहुलीचा खेळ फसला; सांगरुळात अंधश्रद्धेचा भंडाफोड
|