राजकीय

मतदान संपलं… आता पैजांचा थरार! २१ डिसेंबरपर्यंत राजकीय तापमान ‘हाय

21 december political result


By nisha patil - 4/12/2025 2:43:29 PM
Share This News:



मतदान संपलं… आता पैजांचा थरार! २१ डिसेंबरपर्यंत राजकीय तापमान ‘हाय

नगरपालिका निवडणुकीत तब्बल ७८ टक्के मतदान झाल्यानंतर राजकारणापेक्षा कार्यकर्त्यांच्या पैजांचा खेळच रंगला आहे. न्यायालयाने मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी वाढली आहे.

कागल, मुरगूड आणि जयसिंगपूरमध्ये प्रचंड चुरस. मतदानाची आकडेमोड करूनच दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांवर लाखोंच्या पैजा लावत आहेत. मुरगूडमध्ये तर सरळ एक लाखाची रोख पैज लावल्याची चर्चा.

कागलमध्ये हसन मुश्रीफ–समरजितसिंह घाटगे आघाडी विरुद्ध संजय मंडलिक, तर मुरगूडमध्ये शिवसेना शिंदे गट–भाजप एकत्र येत मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याच्या तयारीत. कागलमध्ये ८०%, मुरगूडमध्ये तब्बल ८८% एवढा विक्रमी मतदान टक्का नोंदला गेला.

महिला मतदारांची मोठी उपस्थिती यंदाच्या निकालात ‘गेमचेंजर’ ठरणार यात शंका नाही. टक्का वाढला… पण धक्का कुणाला बसणार? याची उत्सुकता २१ डिसेंबरच्या मतमोजणीपर्यंत कमालीची वाढली आहे.


मतदान संपलं… आता पैजांचा थरार! २१ डिसेंबरपर्यंत राजकीय तापमान ‘हाय
Total Views: 20