बातम्या

शिवाजी विद्यापीठात 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या

21 year old girl commits suicide at Shivaji University


By nisha patil - 12/8/2025 4:21:16 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात 21 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव गायत्री रेळेकर असून ती सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील रहिवासी होती.

भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली गायत्री तीन दिवस गावी गेल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूरला परतली होती. दुपारी मैत्रिणी परत आल्यावर रुम आतून बंद असल्याने संशय निर्माण झाला. खिडकीतून पाहता तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


शिवाजी विद्यापीठात 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या
Total Views: 126