बातम्या

आबू रोड येथे ‘विश्व नवनिर्माण’ राजयोग अनुभूती शिबिराला २१० बंधू-भगिनींचा सहभाग........... 

210 brothers and sisters participated


By nisha patil - 1/10/2026 2:55:22 PM
Share This News:



आबू रोड येथे ‘विश्व नवनिर्माण’ राजयोग अनुभूती शिबिराला २१० बंधू-भगिनींचा सहभाग........... 
 

आबू रोड (राजस्थान) : प्रतिनिधी आचिन हेरवाडे........ आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून आत्मिक शक्ती, सकारात्मक विचार आणि दिव्य गुणांची अनुभूती देण्यासाठी ब्रह्माकुमारीज विश्व विद्यालय, मुख्य केंद्र, आबू रोड (राजस्थान) येथे ‘आध्यात्मिक जागृती से विश्व नवनिर्माण – राजयोग अनुभूती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे शिबिर सुरू झाले आहे.
 

या शिबिरासाठी कोल्हापूर ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या मुख्य प्रवर्तक आदरणीय ब्रह्माकुमारी सुंनदा दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इचलकरंजी ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका  आदरणीय ब्रह्माकुमारी आशा दीदीजी यांच्या नियोजनाखाली कोल्हापूर, इचलकरंजी,दत्तवाड, तारदाळ, कबनूर, टाकवडे, दानवाड व परिसरातील एकूण २१० बंधू-भगिनी सहभागी झाले आहेत.
 

शिबिरामध्ये आध्यात्मिक जागृती , परमात्म अनुभूती, राजयोग ध्यान, दिव्य गुणांचा विकास, सकारात्मक जीवनदृष्टी तसेच सृष्टीचक्र याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. सहभागी बंधू-भगिनींना राजयोगाच्या माध्यमातून मनःशांती, आत्मिक बळ आणि जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

या शिबिरात बी. के. सुवर्णा बहन,बी. के. प्रतिभा बहन आणि बी.के. सचिन भाई यांच्याकडून सहभागींचे मार्गदर्शन करण्यात येत असून, आबू रोड येथील ब्रह्माकुमारीज मुख्य केंद्र व परिसरातील विविध आध्यात्मिक स्थळांची तसेच तेथील उपक्रमांची माहितीही सहभागीांना देण्यात येत आहे.
आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता, बंधुभाव आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


आबू रोड येथे ‘विश्व नवनिर्माण’ राजयोग अनुभूती शिबिराला २१० बंधू-भगिनींचा सहभाग........... 
Total Views: 11