बातम्या

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींची २४ वी ऊस परिषद १६ ऑक्टोबरला

24th Sugarcane Conference of Swabhimaani in Jaysingpur on 16th October


By nisha patil - 10/14/2025 4:52:21 PM
Share This News:



जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींची २४ वी ऊस परिषद १६ ऑक्टोबरला

१६ ऑक्टोबरला जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींची ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १६ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २४ वी ऐतिहासिक ऊस परिषद होणार आहे. ही माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली.

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उत्तर कर्नाटक भागात परिषदेसाठी तयारी सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून शेतकरी मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहेत.
मोरे यांनी सांगितले की साखर कारखानदार रिकव्हरी चोरी, तोडणी-वाहतूक आणि उपपदार्थामधून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. एफ.आर.पी.मध्ये वाढ झाली तरी ऊस दर ३,००० ते ३,२०० रुपयांवरच स्थिर आहे.

राज्य सरकार आणि साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले असल्याने शेतकऱ्यांना फक्त २,५०० रुपये पहिली उचल मिळणार असून याचा फटका उत्पादकांना बसणार आहे. परिषदेत या सर्व मुद्यांवर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.


जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींची २४ वी ऊस परिषद १६ ऑक्टोबरला
Total Views: 94