बातम्या

जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कची २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी — आ. सतेज पाटील यांची मागणी

25 acres of Shenda Park should be made available


By nisha patil - 11/11/2025 5:03:44 PM
Share This News:



जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कची २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी — आ. सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी कृषी विभागाची शेंडा पार्क येथील २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषिमंत्री दत्ता भरणे यांना निवेदन दिले आहे.

कोल्हापूरची “क्रीडानगरी” म्हणून देशभरात ओळख असून, येथे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत. अशा पार्श्वभूमीवर अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षण केंद्रे आणि मोठ्या स्पर्धांचे आयोजन करता यावे म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

२०२२ मध्ये पालकमंत्री असताना त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे सादर केला होता. मात्र, शेंडा पार्क येथील जागा इतर विभागांना दिल्याने क्रीडा संकुलासाठी योग्य जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

शेंडा पार्कचे एकूण क्षेत्रफळ ५३७ एकर असून, त्यातील २१७ एकर जागा विविध सरकारी कार्यालयांसाठी राखीव आहे; पण क्रीडा विभागासाठी जागा अद्याप देण्यात आलेली नाही. प्रशासनाने मोरेवाडी परिसरातील जागा सुचवली असली तरी तेथील सुविधांचा अभाव असल्याने ती जागा गैरसोयीची असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

शेंडा पार्क परिसर शहराजवळ असल्याने खेळाडूंना सोयीचा असून, त्याच ठिकाणी संकुल उभारावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.


जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कची २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी — आ. सतेज पाटील यांची मागणी
Total Views: 31