बातम्या

महिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ

254 women employees benefited from the health camp


By Administrator - 10/3/2026 1:25:14 PM
Share This News:



महिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ

कोल्हापूर, ता. 10: जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सावित्रीबाई रुग्णालय येथे महिला आरोग्य कर्मचारी व इतर महिला कर्मचा-यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ महापालिकेच्या २५४ महिला कर्मचा-यांनी घेतला. या शिबीराचा शुभारंभ महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. हा कार्यक्रम आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह व रक्तदाब), महिला पोषण जागरूकता, प्रसूतीपूर्व तपासणी, कर्करोग जागरूकता व तपासणी, क्षयरोग जागरूकता व तपासणी, स्त्रीरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, दंतरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, रक्त तपासणी तसेच मोफत औषध वितरण अशा विविध आरोग्य सेवा महिलांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसेवक विनायक फाळके, अमर समर्थ, नगरसेविका सौ. निलिमा पाटील, नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. योगिता भिसे तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी व महापालिकेच्या महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.


महिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ
Total Views: 7