बातम्या

२७ टेम्पो मदतीचे साहित्य मराठवाड्याकडे रवाना

27 tempos of relief materials sent to Marathwada


By nisha patil - 9/29/2025 5:46:30 PM
Share This News:



२७ टेम्पो मदतीचे साहित्य मराठवाड्याकडे रवाना

 पुढील टप्प्यात शालेय साहित्य पाठवणार :  आ. सतेज पाटील

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने आणि खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी जमा झालेली मदत आज रवाना करण्यात आली. कसबा बावडा भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तब्बल २७ टेम्पो मदतीचे साहित्य मराठवाड्याकडे रवाना झाले.

यात धान्य, किराणा, पाणी बाटल्या, कपडे, ब्लँकेट्स, प्रथमोचार साहित्य आणि शालेय साहित्याचा समावेश आहे. पुढील टप्प्यात शालेय दप्तरं आणि वह्यांची मदतही पाठवण्यात येणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.


२७ टेम्पो मदतीचे साहित्य मराठवाड्याकडे रवाना
Total Views: 81