बातम्या
आजरा साखर कारखान्याचा 27 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
By nisha patil - 10/15/2025 6:05:55 PM
Share This News:
आजरा साखर कारखान्याचा 27 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2025-26चा 27वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज बुधवार दि. 15/10/2025 रोजी सकाळी 11:00 वा.कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन सुभाष देसाई व सर्व संचालक मंडळ यांचे हस्ते संपन्न झाला.
आजरा साखर कारखान्याच्या 27व्या गळीत हंगामाची पूर्ण तयारी झालेली असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने मशनरी सज्ज झाली आहे. त्याचप्रमाणे ऊस तोडणी ओढणीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याकडे गाळपास पाठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
बॉयलर अग्नीप्रदिपनापूर्वी कारखान्याच्या संचालिका सौ. मनीषा रवींद्र देसाई व त्यांचे पती रविंद्र रघुनाथ देसाई यांचे शुभहस्ते विधिवत होम हवन पूजा पार पडली. यावेळी माजी चेअरमन वसंतराव धुरे, जेष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, संचालक.. मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, दीपक देसाई, रणजीत देसाई, हरिभाऊ कांबळे, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, काशिनाथ तेली, रशीद पठाण, दिगंबर देसाई, संचालिका रचना होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, जनरल मॅनेजर(टेक्नि.)एम. आर. पाटील, चीफ केमिस्ट सुजय देसाई, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण,खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्याचा 27 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
|