ताज्या बातम्या

"CS Exam 2025: कोल्हापूरच्या 28 विद्यार्थ्यांचा मोठा विजय!"

28 students from Kolhapur successfully crack the ICSI exam


By nisha patil - 7/16/2025 7:09:47 PM
Share This News:



कोल्हापूर:द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) या भारत सरकारच्या अधिनस्त उच्च व्यावसायिक संस्थेने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कोल्हापूर विभागातील तब्बल २८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

ही परीक्षा उत्तीर्ण करून या विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीच्या प्रवासातील पहिली आणि महत्त्वाची पायरी यशस्वीरित्या पार केली आहे.

ICSI ही संस्था कंपनी सेक्रेटरी या व्यवसायाच्या व्यावसायिक व कायदेशीर स्वरूपाच्या उन्नतीसाठी कार्य करते. 1980 मध्ये कंपनी सेक्रेटरीज अ‍ॅक्टअंतर्गत स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी तीन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते

1. CSEET (कार्यकारी प्रवेश परीक्षा)

2. Executive Program (कार्यकारी कार्यक्रम)

3. Professional Program (व्यावसायिक कार्यक्रम)

या परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध अभ्यास, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीनेच यशस्वीरीत्या पूर्ण करता येतात.

यशस्वी विद्यार्थी:
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये दीप नितीन पाटणे, सुहान शानूर पटेल, श्रावणी हेमंत भोजने, मैथिली माधव मिरजे, श्रावणी आनंदराव पाटील, हर्ष यशवंत बचाटे, तनिष्का नागेश घुगरे, तन्वीर सूरज नदाफ, अनुष्काराजे उदय महाडिक, जान्हवी अमृत पाटील यांचा समावेश आहे.

तसेच ऐश्वर्या विजय पानगे, आसावरी राहुल लांडगे, अभिषेक निखिल पंडितराव, अन्वी अश्विनकुमार इंग्रोले, मोहित नितीन मुसळे, हर्षवर्धन सागर तेली, अभिषेक मारुती तेली, वेदांत ऋतुराज वालावलकर, मृणाल सुधीर चौगुले, राधिका सुधाकर सावंत, सामंत हर्षदा दत्तदास, मिथुन पंढरी हळदणकर, देवश्री तुषार पोकळे, श्रद्धा दीपक साजनकर, ट्यूलिप हरिनारायण जाखोटिया, वेदिका ब्रिजेश विभूते, विशाखा सुनील दाभाडे आणि वर्चस्व वर्धमान मगदूम हे विद्यार्थी देखील यामध्ये यशस्वी ठरले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे तारा न्यूजतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा!


 


"CS Exam 2025: कोल्हापूरच्या 28 विद्यार्थ्यांचा मोठा विजय!"
Total Views: 484