बातम्या
म्हाकवेत वीज पडून २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
By nisha patil - 10/18/2026 11:59:05 AM
Share This News:
म्हाकवेत वीज पडून २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
म्हाकवे (ता. कागल) : म्हाकवे येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून रणजीत सिद्राम पाटील (वय २८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
रणजीत पाटील हा आपल्या आई-वडिलांसोबत शेतात काम करत होता. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे म्हाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
म्हाकवेत वीज पडून २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
|