विशेष बातम्या

शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावात ३० एकर वनसंपदा बेकायदेशीरपणे नष्ट

30 acres of forest wealth illegally destroyed in Shimpe village of Shahuwadi taluka


By nisha patil - 5/19/2025 5:09:42 PM
Share This News:



शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावात ३० एकर वनसंपदा बेकायदेशीरपणे नष्ट

सरपंच व ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर नागरिकांचा रोष

शिंपे (ता. शाहूवाडी) गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कोणतीही ग्रामसभा न घेता आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता सुमारे ३० एकर वनजमिनीत हजारो औषधी व आयुर्वेदिक झाडांची कत्तल केली आहे. ही वनसंपदा अत्यंत मौल्यवान असून यामध्ये चंदन व सागवान यांसारखी झाडे होती. नागरिकांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांनी आरोप केला की ही जमीन हडप करण्यासाठी ठराव न घेता गावकऱ्यांपासून माहिती लपवली गेली. काही ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंच राजकीय पाठबळाचा हवाला देत धमक्या दिल्याचेही सांगितले. या प्रकरणात महसूल व वनविभागातील अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीचा संशय व्यक्त होत असून जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावात ३० एकर वनसंपदा बेकायदेशीरपणे नष्ट
Total Views: 107