बातम्या
पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांचा तडजोडीतून निकाल; १४२ खातेदारांना दिलासा!
By nisha patil - 10/10/2026 3:19:07 PM
Share This News:
पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांचा तडजोडीतून निकाल; १४२ खातेदारांना दिलासा!
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत पन्हाळा तहसील कार्यालयात आयोजित महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणे परस्पर संमतीने निकाली काढण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १४२ खातेदारांना लाभ मिळाला, अशी माहिती तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिली. या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांतील संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित राहिले. यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष उपस्थित राहून परस्पर संमतीने तडजोड सादर केली.
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून महसूलविषयक प्रकरणे सामोपचाराने आणि परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालतींचे आयोजन करण्यात येत आहे.
पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांचा तडजोडीतून निकाल; १४२ खातेदारांना दिलासा!
|