बातम्या

नाम.प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर*

300 praksh abitkar


By nisha patil - 1/7/2026 1:59:16 PM
Share This News:



**नाम.प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर*

 **३०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद**

**आजरा(हसन तकीलदार)*:-: कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत धनुर्वात (Tetanus) लसीकरण शिबिराचे आयोजन रवळनाथ मंदिर,पेरणोली परिसरात करण्यात आले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे ३०० ज्येष्ठ नागरिकांनी धनुर्वात प्रतिबंधक लस घेत आरोग्य सुरक्षिततेचा लाभ घेतला. यावेळी पेरणोली विद्या मंदिरात वृक्षारोपणाचा ही कार्यक्रम झाला. शिवसेनेच्या वतीने आयोजित उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. लोकनियुक्त सरपंच वनश्री देसाई, संतोष जाधव, एकनाथ जोशीलकर, रवींद्र देसाई, ग्रामपंचायत सदस्या सुनीता कालेकर हे प्रमुख उपस्थित होते. शिबिरामध्ये आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविकांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली. नागरिकांची नोंदणी, प्राथमिक आरोग्य तपासणी आणि लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली.

यावेळी राजेंद्र सावंत म्हणाले, प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, या मोफत धनुर्वात लसीकरण शिबिरामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर संरक्षणात्मक लस मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी भाऊ भोकरे, एकनाथ जोशीलकर , नामदेव सावंत, हर्षद लोंढे, रणजित कालेकर (पत्रकार )यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


नाम.प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर*
Total Views: 127