बातम्या

खुटाळवाडीत ३४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

34 ear old youth commits suicide by hanging himself


By nisha patil - 11/27/2026 8:34:17 PM
Share This News:



खुटाळवाडीत ३४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
 

पत्नी माहेरी राहत असल्याच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती

 प्रतिनिधी अजित बोडके शाहूवाडी | प्रतिनिधी :   शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील रामनगर परिसरात सागर कृष्णा खडके (वय ३४) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खुटाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

मिळालेल्या माहितीनुसार, सागर खडके यांनी आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतला. पत्नी माहेरी राहत असल्यामुळे ते नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 

या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मलकापूर येथे नेण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संभाजी पाटील करीत आहेत.


खुटाळवाडीत ३४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
Total Views: 8