विशेष बातम्या
नरवीर शिवा काशीद यांची ३६५वी पुण्यतिथी पन्हाळगडावर साजरी
By nisha patil - 7/14/2025 2:41:16 PM
Share This News:
नरवीर शिवा काशीद यांची ३६५वी पुण्यतिथी पन्हाळगडावर साजरी
पन्हाळा | कोल्हापूर किल्ले पन्हाळा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, कोल्हापूर, नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांची ३६५ वी पुण्यतिथी अत्यंत अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.
या प्रसंगी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळावर आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून नरवीर शिवा काशीद यांना विनम्र अभिवादन केले.
इतिहासाची साक्ष...
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर शत्रूच्या वेढ्यात असताना, शिवा काशीद यांनी महाराजांचा वेष धारण करून शत्रूच्या छावणीत प्रवेश केला आणि वीरमरण पत्करले. त्यांच्या या बलिदानामुळे महाराजांना विशाळगडावर सुरक्षित पोहोचता आले. त्यांच्या या अद्वितीय शौर्याला मानाचा मुजरा करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा...
या कार्यक्रमात समाज भूषण पुरस्कार श्री. पांडुरंग भोसले (साळवण) व समाज रत्न पुरस्कार श्री. भिमराव शिंदे (केर्ली) यांना आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती...
या कार्यक्रमाला बुलढाण्याचे आमदार सिद्धार्थ खरात, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारूती टिपुगडे, विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद, महिला जिल्हाध्यक्षा मेधाराणी जाधव, कार्याध्यक्ष दिगंबर टिपुगडे, सुनिल इंगळे, कोषाध्यक्ष अनिल संकपाळ, सरचिटणीस मयुर रोकडे, संवर्धन समितीचे अध्यक्ष गजानन शिंदे, तसेच पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, बंडा पाटील, रविंद्र धडेल, चेतन भोसले, शैलेंद्र लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नरवीर शिवा काशीद यांची ३६५वी पुण्यतिथी पन्हाळगडावर साजरी
|