बातम्या

कागलमधून 38 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलीस तपास सुरू “कामावर जातो” सांगून घरातून निघाला, आठवडाभरापासून पत्ता नाही

38 year old man missing from Kagal

By nisha patil - 5/5/2026 5:26:03 PM
Share This News:

कागलमधून 38 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलीस तपास सुरू “कामावर जातो” सांगून घरातून निघाला, आठवडाभरापासून पत्ता नाही

राजेश कुटे यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन कागल तालुक्यातील जयसिंगराव पार्क परिसरातून 38 वर्षीय राजेश तात्याराम कुटे हे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कागल पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 35/2026 नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश कुटे हे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास “कामावर जातो” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते परत घरी आले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला, परंतु काहीच माहिती मिळाली नाही.

शेवटी त्यांच्या पत्नी सौ. जयश्री राजेश कुटे (वय 34, रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांनी 27 एप्रिल रोजी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ता व्यक्तीचे वर्णन सडपातळ बांधा, गोरा रंग, उंची सुमारे 5 फूट 6 इंच, काळे केस, सरळ नाक असे असून, अंगात पिवळा टी-शर्ट व निळी जिन्स पॅन्ट घातलेली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. टी. पाटील करीत असून, अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कागलमधून 38 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलीस तपास सुरू “कामावर जातो” सांगून घरातून निघाला, आठवडाभरापासून पत्ता नाही
Total Views: 17