ताज्या बातम्या

रत्नागिरीत ४२ फुटांचा मृत व्हेल मासा सापडला; मिऱ्या किनाऱ्यावर खड्डा खणून पुरला

42 foot dead whale found in Ratnagiri


By nisha patil - 9/27/2025 1:43:02 PM
Share This News:



रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या अलावा समुद्रकिनारी तब्बल ४२ फुटांचा मृत व्हेल मासा आढळून आला. पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत हा मासा काही महिन्यांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे शुक्रवारी या व्हेल माशाला किनाऱ्यावरच खड्डा खणून पुरण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर स्थानिकांनी समुद्रकिनारी पाहणी केली असता हा मोठा व्हेल मासा किनाऱ्यावर आढळून आला. त्याच्या मृतदेहाचे पूर्णपणे विघटन झाल्यामुळे दुर्गंधी अधिकच तीव्र झाली होती.

याआधीही मृत व्हेल आढळले

गेल्या वर्षभरात रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे किनाऱ्यावरही मृत व्हेल माशांचे अवशेष आढळले होते. वारंवार मृत व्हेल किनाऱ्यावर येण्यामागील कारणांबद्दल स्थानिकांमध्ये उत्सुकता आहे.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

शुक्रवारी सकाळी कांदळवन कक्षाचे क्षेत्रपाल किरण ठाकूर आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत किनाऱ्यावरील वाळूत मोठा खड्डा खणून या व्हेल माशाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.


रत्नागिरीत ४२ फुटांचा मृत व्हेल मासा सापडला; मिऱ्या किनाऱ्यावर खड्डा खणून पुरला
Total Views: 138