बातम्या
कोल्हापुरात मोटारसायकल अपघातात ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू
By nisha patil - 9/22/2026 2:17:31 PM
Share This News:
कोल्हापुरात मोटारसायकल अपघातात ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : कनाननगर परिसरातील वायल्डर मेमोरियल चर्चसमोरील रस्त्यावर २१ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता मोटारसायकल अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम रामेश्वर शिंदे (वय ४६, रा. कनाननगर, कोल्हापूर) या जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापुरात मोटारसायकल अपघातात ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू
|