बातम्या
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनासाठी ५ हजार कार्यकर्त्यांचा पुण्याकडे मोर्चा
By nisha patil - 6/6/2025 9:00:43 PM
Share This News:
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनासाठी ५ हजार कार्यकर्त्यांचा पुण्याकडे मोर्चा
कोल्हापूर, ६ जून –राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जून रोजी पुणे बालेवाडीत होणाऱ्या वर्धापन दिनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापुरात शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी 'गोकुळ'चे नवनिर्वाचित अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा सत्कारही झाला.
मुश्रीफ म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. महायुतीचा झेंडा फडवण्यासाठी सज्ज व्हा. राष्ट्रवादी काँग्रेसला अग्रस्थान मिळवून द्या."
के. पी. पाटील म्हणाले, "महाराष्ट्रासाठी अजित पवार, तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ हे आमच्यासाठी हिमालयासारखे आहेत."
बैठकीला अनेक पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनासाठी ५ हजार कार्यकर्त्यांचा पुण्याकडे मोर्चा
|