बातम्या

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास

50 tolas of jewellery missing


By nisha patil - 8/13/2025 1:22:11 PM
Share This News:



 मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास; कोल्हापुरात दिवसाढवळ्या डॉक्टरच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला
 

कोल्हापूर : शहरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवार दुपारी डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे दार उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. हे दागिने मुलाच्या लग्नासाठी खास ठेवण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके कार्यरत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, दिवसाढवळ्या घरफोडीच्या वाढत्या घटना रोखण्याबाबत नागरिकांकडून पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास
Total Views: 115