राजकीय

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेबांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

53 birthday celebration


By Administrator - 4/13/2025 2:54:57 PM
Share This News:



कोल्हापूर, कसबा बावडा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत निवास येथे राजकीय, सामाजिक, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या विशेष प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल ६ लाख वह्यांचे संकलन करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या या वह्यांचे संकलन हा एक समाजाभिमुख उपक्रम ठरला असून साहेबांवरील जनतेच्या प्रेमाचे प्रतीक ठरला आहे.

कार्यक्रमस्थळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीमुळे यशवंत निवास परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व वयोगटातील नागरिक, युवक वर्ग, महिलांपासून ते विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, मान्यवर आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

या उपक्रमातून सामाजिक जाणीव जागृत करत एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला असून, त्यांच्या नेतृत्वाखालील जनसंपर्क आणि समाजकार्य यांचे उत्तम उदाहरण या निमित्ताने दिसून आले.

 

 


आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेबांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
Total Views: 192