ताज्या बातम्या
शिरसंगीमध्ये 53वे विज्ञान प्रदर्शन उद्घाटन
By nisha patil - 11/12/2025 12:40:27 PM
Share This News:
आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित आदर्श हायस्कूल शिरसंगी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिमाखात सुरू झाले. दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
मुख्याध्यापक संजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव अभिषेक शिंपी आणि प्रा. एस. के. नेर्ले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासूवृत्ती व शोधक वृत्ती निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
उच्च प्राथमिक, माध्यमिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथ प्रदर्शन अशा विविध दालनांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी, शिक्षकवर्ग, अधिकारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात बालशास्त्रज्ञांच्या नवकल्पनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यक्रम उत्साहात सुरू आहे.
शिरसंगीमध्ये 53वे विज्ञान प्रदर्शन उद्घाटन
|