बातम्या

व्यंकटराव हायस्कुल येथे 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात संपन्न*

541


By nisha patil - 10/10/2026 10:56:18 PM
Share This News:



*व्यंकटराव हायस्कुल येथे 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात संपन्न*

आजरा(हसन तकीलदार)*. येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये हादगा बोळवण समारंभ उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमासाठी व्याख्यात्या सौ.पुष्पावती जयवंत दरेकर (मुख्याध्यापिका विद्यामंदिर हसुरवाडी) यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आधुनिक युगातील प्रसार माध्यमे, इंटरनेटचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम ,त्यातील संधी, आव्हाने, सुरक्षितता त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा त्याबद्दल मार्गदर्शन केले.

उपस्थित सर्व विद्यार्थी हे आजरा तालुक्याच्या लाल मातीची दौलत आहेत, विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करावा, सद्सद्विवेक बुद्धी व कार्यकारणभाव यांची सांगड घालावी ही अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांना मौलीक संदेश दिला.      

    विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रसार माध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा याबाबत सांगताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अलका जयवंतराव शिंपी यांनी सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधत आजच्या या विज्ञान युगात आपली संस्कृती जतन करून ठेवण्यासाठी असे लोकोत्सव कार्यक्रम शालेय जीवनापासूनच साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

      या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सदस्या ..सौ.आशा सचिन शिंपी, प्राचार्य एस.एन.पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन.ए. मोरे, सौ.एस.डी.इलगे, सौ.एस. टी.पाटील, सौ.व्ही.ए.वडवळेकर, सौ.ए.एस. गुरव, श्रीमती एम. व्ही. बिल्ले, श्रीम.एम.एम. शिप्पुरकर, एस.वाय. देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती आर.एन. पाटील, अतिथी परिचय श्रीमती एस.के.कुंभार, व आभार सौ.ए.डी.पाटील यांनी केले. 

   कलाशिक्षक श्रीकृष्णा दावणे यांनी मैदानावर साकारलेली भव्य हत्तीची रांगोळी कलाकृती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. या हत्तीच्या भव्य रांगोळी भोवती इयत्ता सहावी व आठवीच्या मुली व सर्व शिक्षिका यांनी फेर धरून सुंदर गाणी साकारली. या कार्यक्रमासाठी जवळजवळ 450 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.


व्यंकटराव हायस्कुल येथे 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात संपन्न*
Total Views: 16