बातम्या
राष्ट्रगीत अवमान प्रकरणी आरोप असलेले 56 माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता.. करण्यात आली
By nisha patil - 12/23/2025 5:44:49 PM
Share This News:
राष्ट्रगीत अवमान प्रकरणी आरोप असलेले 56 माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता.. करण्यात आली
आज दिनांक 20- 2 -2006 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेमधील सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी तत्कालीन 56 नगरसेवक यांचे विरुद्ध मे. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयात फिर्यादी मेजर संजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केलेली होती सदरची केस 19 वर्ष सुरू होती
सदर केस मधील फिर्यादी यांची केस शाबित न झाल्यामुळे तत्कालीन 56 नगरसेवकांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी 56 नगरसेवकांना मे. मुख्य न्यायदंडाधिकारीसो कोल्हापूर ( मे. गादिया साहेब ) यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आज दि 23-12-2025 रोजी केली सदर 56 नगरसेवक यांच्यातर्फे एडवोकेट हर्षा खंडेलवाल, एडवोकेट गजानन कोरे, एडवोकेट के पी राणे, एडवोकेट पी डी सामंत, व एडवोकेट व्ही व्ही पाटील यांनी काम पाहिले
यावेळी उपस्थित - संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, प्रकाश पाटील, राजू आवळे, सागर चव्हाण, राजू कसबेकर, रफिक मुल्ला, अशोक जाधव, तुकाराम तेरदाळकर, विजय साळोखे सरदार, सतीश घोरपडे, ईश्वर परमार, संभाजी देवणे, संजय चौगुले
राष्ट्रगीत अवमान प्रकरणी आरोप असलेले 56 माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता.. करण्यात आली
|