बातम्या

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्य रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम

60


By nisha patil - 6/19/2026 8:20:07 PM
Share This News:



**शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्य रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम*

आजरा(हसन तकीलदार)*:- शिवसेनेच्या 60 वा वर्धापन दिन शिवसेना आजराच्यावतीने अतिशय उत्साहात आणि विधायक कार्याने साजरा करणेत आला. संघर्षातून उभ्या असणाऱ्या या संघटनेला आज 6 दशके पूर्ण झाली.

सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढण्याची आणि रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करण्याची शिकवण शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या शुभ दिनी शिवसेना आजराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामाजिक भान जपत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. तसेच नव्याने होत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयच्या नूतन इमारतीच्या कामाला भेट देऊन सविस्तरआढावा घेतला. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी आजरा संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले,शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, उप तालुका प्रमुख काकासो देसाई, युवासेना तालुका प्रमुख मंदार बिरजे, रणजित सरदेसाई, संतोष भाटले, सुनील दिवेकर,इंद्रजित देसाई, धनंजय पाटील,महेश खेडेकर, विशेष कार्यकारी अधिकारी आमजद माणगावकर तसेच ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.अमोल पाटील, डॉ.सुरजीत पांडव,ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्य रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम
Total Views: 275