बातम्या
तंत्रज्ञान अधिविभागातील ६० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये स्कॉलरशिप आणि इंटर्नशिपसाठी निवड
By nisha patil - 8/22/2025 2:22:39 PM
Share This News:
तंत्रज्ञान अधिविभागातील ६० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये स्कॉलरशिप आणि इंटर्नशिपसाठी निवड
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राइव्हला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कॅम्पस ड्राइव्हमध्ये किरण अकॅडमी पुणे, Q-स्पायडर (टेस्ट यंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) आणि GRD टेक सोलुशन LLP या कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
या ड्राइव्हमध्ये,किरण अकॅडमी पुणेने एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली व Q-स्पायडरने एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यांना स्कॉलरशिप व इंटर्नशिपसह प्रशिक्षणाची संधी दिली आहे. या प्रशिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना नवीनतम तंत्रज्ञानांवर प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामध्ये Generative AI, Prompt Engineering, Advanced Java, Python यांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन व मदतही केली जाणार आहे.
याशिवाय, GRD Tech LLP या उद्योग संस्थेने एकूण २० विद्यार्थ्यांची निवड केली असून या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये अंतिम वर्षाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या संस्थेकडून विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिपची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, इंटर्नशिप व उद्योग क्षेत्राचा थेट अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी अशा टप्यांमधून हे यश संपादन केले.
विभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करून त्यांना उज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाचे सेंट्रल प्लेसमेंट सेल आणि तंत्रज्ञान अधिविभाग प्लेसमेंट सेल यांच्या मदतीने अनेक कंपन्यांचे कॅम्पस ड्राइव्ह विभागामध्ये होत असून विद्यार्थी मोठ्या संख्येने सिलेक्ट व्हावेत यासाठी विभागाचे प्लेसमेंट सेल अधिकारी डॉ. गणेश पाटील सर व त्यांचे सहकारी प्लेसमेंट शाखा समन्वयक अमर डूम व डॉ. चेतन आवटी, तसेच सर्व शाखांचे समन्वयक आणि प्राध्यापकवर्ग हे विशेष परिश्रम घेत आहेत.
तंत्रज्ञान अधिविभागातील ६० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये स्कॉलरशिप आणि इंटर्नशिपसाठी निवड
|