बातम्या
नगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर
By Administrator - 12/3/2026 11:10:01 AM
Share This News:
नगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर
कोल्हापूर ता.11 : नगररचना विभागामार्फत आयोजित केलेल्या एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये आज 62 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण भुखंड/बांधकाम मंजूर करण्यात आली. या कॅम्पमध्ये मंजूर प्रकरणांमधून महापालिकेच्या महसूलामध्ये 10 लाख 85 हजार 088 रुपये उपलब्ध होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या बांधकाम परवानगी प्राप्त प्रकरणाचे मंजूरीकरीता नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील व कनिष्ठ अभियंता यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. तसेच नागरिकांचा या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला.
नगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर
|