बातम्या

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ६२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

62 students of D Y Patil Technical Campus selected in various companies


By nisha patil - 11/21/2025 5:06:56 PM
Share This News:



डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ६२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

तळसंदे:/वार्ताहर तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये  नोकरीसाठी निवड झाली आहे. 

ई.व्ही. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'टाटा ऑटो कॉम्प गोशन ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ‘ओ. पी. मोबिलिटी’ कंपनीच्यावतीने महाविद्यालयात आयोजित कॅम्पस ड्राईव्हमधून हि निवड झाली आहे. अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या १५० विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राईव्ह मध्ये सहभाग घेतला होता. विविध चाचण्यामधून यातील ६२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड  करण्यात आली. यात इलेक्ट्रिकल विभागातील ४५  तर  मेकॅनिकल विभागातील १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 'ट्रेनी इंजीनिअर ' या पदावर या विद्यार्थ्यांना  जॉब ऑफर मिळाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शोएब तांबोळी यांनी दिली.
  
 टेक्निकल  कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. पावसकर म्हणाले, महाविद्यालयातील ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे तांत्रिक प्रावीण्य, आधुनिक ज्ञान व कौशल्ये यांच्या जोरावर हे यश मिळाले आहे. प्राध्यापक व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून सातत्यने केले जणारे मार्गदर्शनाचही फायदा झाला. उद्योगजगताच्या गरजा ओळखून  गुणवत्ता आधारित शिक्षण देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. 

या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रा. मोहसीन बिजली, मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. ए. एस. फरास,   अकॅडेमिक डीन प्रा. आर. एस. पवार यांच्यासह प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील , विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले. 


डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ६२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
Total Views: 24