बातम्या

६४वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा कोल्हापुरात १० नोव्हेंबरपासून

64th Amateur Marathi State Drama Competition in Kolhapur from 10th November


By nisha patil - 5/11/2025 2:47:55 PM
Share This News:



६४वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा कोल्हापुरात १० नोव्हेंबरपासून

हौशी नाट्यप्रेमींची प्रतीक्षा संपली! राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा येत्या १० नोव्हेंबरपासून शाहू स्मारक भवनात सुरू होत आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. जळीत झालेलं केशवराव भोसले नाट्यगृह अद्याप तयार नसल्याने प्रयोग शाहू स्मारकात होतील.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार असून २६ संघांचा सहभाग आहे.

संयोजकांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की, “हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.


६४वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा कोल्हापुरात १० नोव्हेंबरपासून
Total Views: 53