विशेष बातम्या
मुख्यमंत्री सहायता निधीस 65500 ची मदत
By nisha patil - 10/18/2025 3:36:09 PM
Share This News:
मुख्यमंत्री सहायता निधीस 65500 ची मदत
राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी शासनामार्फत 'पूरग्रस्त महाराष्ट्र- एक हात मदतीचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सामाजिक व मानवतावादी उपक्रमाला प्रतिसाद देत महात्मा फुले अँग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी पेन्शनर्स असोसिएशन, शाखा कोल्हापूर यांच्याकडून मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 65500 रुपयाची मदत देण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, कक्ष अध्यक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कोल्हापूर तसेच लक्ष्मण मोरे (समाजसेवा अधीक्षक), डॉ. आर डी घाटगे, डॉ. एम टी इंगवले, डॉ. जी जी खोत, डॉ. व्हि एम धामणे, डॉ. एस ए पाटील, डॉ. ए टी देवकर हे उपस्थित होते. यावेळी समाजातील आपत्तीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे हे प्रत्येक संस्थेचे सामाजिक कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शासनाच्या मदत उपक्रमात सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी आवाहन ही याप्रसंगी करण्यात आले
मुख्यमंत्री सहायता निधीस 65500 ची मदत
|