खेळ

कुंभी नेमबाजी केंद्राच्या 7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

7 athletes from Kumbhi Shooting


By nisha patil - 12/21/2025 4:56:21 PM
Share This News:



कुंभी नेमबाजी केंद्राच्या 7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
 

दिनांक 10 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान भोपाळ व दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी कुंभी कासारी प्रतिष्ठान शूटिंग अकॅडमीच्या 7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यामध्ये 10. मीटर या प्रकारात भोपाळ येथे होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेसाठी
 

1. शिवराज सुभाष कुंभार खुपिरे 
 

2.तन्मय तुकाराम शिपेकर शिपेकरवाडी
 

3.पृथ्वीराज धनाजी जाधव भामटे
 यांची तर दिल्ली येथे  होणाऱ्या  10. मीटर एअर पिस्तल या स्पर्धेसाठी

 

1.निरंजन दीपक जांभळे, बालिंगे
 

2.ऋषिकेश हंबीरराव बंगे खुपिरे, 3.तेजस निवास चव्हाण एकोंडी 4.प्रसन्न प्रवीण भिके कुडित्रे
 या खेळाडूंची निवड झाली असून सर्वत्र यांचे अभिनंदन होत आहे या सर्वांना  कुंभी चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके , कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, कुंभी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी प्रशांत पाटील, लेबर ऑफिसर दयानंद देसाई ,तसेच सर्व कामगार प्रतिनिधी ,कर्मचारी वर्ग, या सर्वांचे सहकार्य लाभत असून नेमबाजी केंद्राचे प्रशिक्षक युवराज चौगले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 


कुंभी नेमबाजी केंद्राच्या 7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Total Views: 78